सहाण बायपास रस्त्याचा अवलंब करण्याचे आवाहन
| अलिबाग | शहर प्रतिनिधी |
सततच्या पडणाऱ्या पावसामुळे अलिबाग-रेवदंडा मार्गावर आक्षी (शिंत्रे गल्ली) जवळ बुधवारी सकाळी झाड कोसळून पडण्याची घटना ताजी असतानाच पुन्हा संध्याकाळी ७ च्या सुमारास त्याच ठिकाणी सागाचे झाड पडले असून अलिबाग-रेवदंडा वाहतूक पूर्णपणे ठप्प झालेली आहे. स्थानिकांकडून सहाण बायपास रस्त्याचा अवलंब करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तसेच, महावितरणचे नुकसान होऊन परिसरातील वीज पुरवठा पूर्णपणे खंडित झालेला आहे.