। नवीन पनवेल । वार्ताहर ।
20 ऑगस्ट आणि 21 ऑगस्ट रोजी एमजेपीकडून 40 तासांचा शटडाऊन नियोजित करण्यात आला आहे. त्यामुळे या कालावधीत पूर्ण पाणी पुरवठा बंद राहणार आहे. न्हावाशेवा पाणीपुरवठा योजना अंतर्गत भोकरपाडा येथील शुद्ध पाण्याचा उपसा करणार्या पंपाची मुख्य हेडरलाईन बदलणे व अनुषंगिक इतर कामे या कारणास्तव 20 ऑगस्ट रोजी सकाळी 9 ते 21 ऑगस्ट रोजी रात्री 12 वाजेपर्यंत शट डाऊन घेण्यात येणार आहे. शटडाऊन कालावधीच्या आधी जास्तीत जास्त पाणी टाक्यांमधून साठवून पाण्याची काटकसर करावी. तसेच 22 ऑगस्ट व 23 ऑगस्ट रोजी कमी दाबाने पाणीपुरवठा होईल असे पत्रक एमजेपीतर्फे काढण्यात आले आहे.