राजकीय द्वेषातून अंतोरे ग्रा.पं.ची बदनामी; सरपंच अमित पाटील यांचा आरोप

पेण | वार्ताहर |
अंतोरा ग्रामपंचायतीची राजकीय द्वेशातून चुकीच्या पध्दतीने बदनामी केली जात असल्याचा आरोप सरपंच अमित पाटील यांनी केला आहे. ग्रामपंचायत अंतोरे येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करून ग्रामपंचायतीला कशा प्रकारे बदनाम केले जात आहे या बद्दल माहिती त्यांनी दिली.
या पत्रकार परिषदेसाठी उपसरपंच प्रशांत पाटील, सदस्य राजेश कांबळे, मेधा पाटील, हिराभाई पाटील, प्रगती पाटील, जमिरा दिवडे, आशा म्हात्रे व ग्रामसेवक प्रविण पाटील उपस्थित होते.
अंतोरे ग्रामपंचायतने कोणतेही काम बेकायदेशीर केलेले नसून कायदेशीरच केले आहेत. मात्र गावातील दलित वस्ती अंतर्गत असणार्‍या रस्त्याची पूर्ण माहिती न घेता चुकीच्या पध्दतीने पंचायत समिती, जिल्हाधिकारी, मुख्यकार्यकारी अधिकारी रायगड परिषद, ग्रामविकास सचिव, ग्रामविकास मंत्री, सामाजिक मंत्री तथा मुख्यमंत्री यांच्या कडे ग्रामसेवक प्रविण पाटील यांनी भ्रष्टाचार केल्या बाबत तक्रारी अर्ज केला आहे. मात्र खरी स्थिती खूप वेगळी असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले.
या मध्ये ग्रामसेवकांनी कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार अगर चुकीचे काम केले नाही. दलित वस्ती अगर केलेल्या रस्त्याच्या कामा संदर्भात 28 मे 2019 रोजी ग्रामपंचायतीच्या सर्व साधारण सभेत एक मुखी ठरावाने दलित वस्ती अंतर्गत रस्त्याचे काम करण्याचा ठराव घेण्यात आला. या ठरावाला सुचक म्हणून राजेश मारुती कांबळे व अनुमोदक म्हणून प्रगती हेमंत पाटील यांनी सहया देखील मारलेल्या आहेत. त्या नंतर या कामाची निविदा सुचना 25 मे 2021 रोजी स्थानिक वृत्त पत्रात प्रसिध्दी केली आहे. त्या नंतर वेगवेगळया निविदा ग्रामपंचायतीला प्राप्त झाल्या त्या नंतरच ठेकेदार निश्‍चित करण्यात आले. व त्या नंतर कामाला सुरूवात झाली. मात्र तक्रार करणार्‍याने हे काम दलित वस्ती मध्ये झाले नसून दुसरीकडे झाले आहे अशी तक्रार केली असल्याचे त्यांनी सांगितले.
आज विस्तार अधिकारी विक्रांती तांडेल व पंचायत समिती बांधकाम अभियंता आगलावे यांनी स्थळ पंचनामा केला असून या रस्त्याचा उपयोग होणार्‍या पैकी रणपिसे कुटुंबीयांनी स्पष्ट सांगितलेले आहे की या रस्त्याचा उपयोग आमच्यासाठी होत आहे. त्यामुळे जे आरोप केले जात आहेत ते चुकीचे व ग्रामपंचायतीला बदनाम करण्याचे केले जात आहेत. जर या कामाचा ठराव 2019 मध्ये झाला आहे, त्यावर कुणी अक्षेप घेतला नाही तसेच निविदा सुचना प्रसिध्द झाल्यावर देखील त्यावर आक्षेप झाला नाही. कारण ग्रामपंचायतीने कोणतीच बाब बेकायदेशीर केलेली नाही. जो काम झालेला आहे तो दलित वस्तीसाठीच झालेला आहे असे माझे ठाम मत आहे. असे सरपंच अमित पाटील यांनी प्रसार माध्यमांना सागितले. या वेळी ग्रामसेवक प्रविण पाटील यांनीही माहिती दिली.

Exit mobile version