आता कोकणातच होणार कर्करोगावर उपचार

डेरवणमध्ये न्युक्लियर मेडिसीन सेंटरचे भूमिपूजन

| पोलादपूर | प्रतिनिधी |

कोकणातील जनतेला आता कर्करोगासारख्या दुर्धर आजारावर उपचार करण्यासाठी मुंबई, पुणे येथे जाण्याची आवश्यकता भासणार नाही. कारण डेरवण, ता.चिपळूण येथील वालावलकर रुग्णालयात माफक दरात कर्करोगावर उपचार केले जाणार आहे. या रुग्णालयात न्युक्लियर मेडिसीन सेंटरचे भूमिपूजन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.

अत्याधुनिक पद्धत उपलब्ध
अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त असलेल्या डेरवण येथील भ.क.ल. वालावलकर रूग्णालयात कँन्सरग्रस्त रूग्णांसाठी कार्यान्वित झालेली उच्च दर्जाची रेडिएशन उपचार करणारी लिनियर एक्सीलेटर व्हेरियन मशीन, न्युक्लियर मेडिसीन विभागाचे झालेले भूमिपूजन यामुळे आता जिल्ह्यातील कँन्सर रूग्णांना उपचारासाठी बाहेरील मोठ्या शहरांत जाण्याची गरजच लागणार नाही. हे रूग्णालय त्यासाठी परिपूर्ण सुसज्ज आहे,

टाटा मेमोरियल सेंटरचे संचालक, पद्मश्री डॉ. राजेंद्र बडवे यांच्या हस्ते वालावलकर रूग्णालयात कॅन्सरग्रस्तांना रेडिएशनसाठी विविध यंत्रणा कार्यान्वित असतानाच आता तब्बल 20 कोटी रूपये खर्चून उपलब्ध केलेल्या अमेरिकन बनावटीच्या आणि व्हेरियन कंपनीच्या लिनियर एक्सीलेटर मशीनचे तसेच न्युक्लियर मेडिसीन विभागाचे भूमिपूजन आणि टाटा मेमोरियल सेंटर व वालावलकर रूग्णालय यांच्यातील सामंजस्य कराराचे नूतनीकरण नुकतेच विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.

लिनियर एक्सीलेटर व्हेरियन मशीनमुळे कँन्सरग्रस्त रूग्णांना रेडिएशनसाठी उच्च दर्जाचे उपचार मिळणार आहेत. त्याचबरोबर आता न्युक्लियर मेडिसीन विभागही स्थापन होणार आहे. ते सुरू झाले तर मधुमेह, रक्तदाब, ककरोग यासाठी लागणारी सामग्री असो अथवा रोग कुठल्या प्रकारचा आहे. हे देखील लक्षात येणार आहे.

डॉ.राजेंद्र बडवे

संस्थेचे विश्‍वस्त विकास वालावलकर यांनी आपल्या प्रास्ताविकात संस्थेच्या माध्यमातून राबवण्यात येणारे विविध समाजोपयोगी उपक्रमांची माहिती दिली. यासोबतच संस्थेच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेले विविध अभ्यासक्रम, त्यांना मिळणारा उत्तम असा विद्यार्थ्यांचा प्रतिसाद याबद्दल त्यांनी उपस्थितांना माहिती दिली. डेरवण येथे सद्गुरू श्री दिगंबरदास महाराज यांच्या संकल्पनेतील विश्‍व आकार घेत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी विठ्ठलराव जोशी चँरिटेबल ट्रस्टचे मुख्य विश्‍वस्त अशोकराव जोशी, रूग्णालय संचालिका डाँ. सुवर्णा पाटील, टाटा मेमोरियल सेंटरच्या डाँ. निशू गोयल, स्पाईन सर्जन डाँ. सुनील नाडकर्णी, डाँ. अजित कुलकर्णी आदी उपस्थित होते.

Exit mobile version