। पोलादपूर । प्रतिनिधी ।
गोवेले, सुतारवाडी आणि केवनाळे येथील 13 जखमींपैकी 6 जणांना तातडीने अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठवणे गरजेचे आहे. मात्र प्रशासनाकडे कोणतेही नियोजन अथवा यंत्रणा नसल्यामुळे जखमींना पोलादपूर येथील ग्रामीण रुग्णालयातच ठेवण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनूसार पोलादपूर येथील ग्रामीण रुग्णालयात जखमींवर उपचार करणे कठिण जात असल्याचे तेथील डॉक्टरांचे म्हणणे आहे. ग्रामीण रुग्णालया पुरशा सोयी-सुविधा नसल्यामुळे त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयातच उपचार करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र सध्या बोरज व साखर दरम्यानचा पूल कोसळल्यामुळे जखमींना अलिबाग रुग्णालयात आणणे शक्य नाही.
त्यासाठी हॅलिकॅप्टरची गरज आहे. हेलिकॉप्टर शिवाय रुग्णांना हलविणे शक्य नाही. मात्र प्रशासनाने त्याबाबत कोणतीही तरतूद केल्याचे दिसून येत नाही. याउलट जखमींवर महाड येथील रुग्णालयात उपचार करण्याचा सल्ला प्रांतानी दिला आहे. त्यामुळे प्रशासकिय अधिकार्यांवर सर्व स्तरातून टिका करण्यात येत आहे.