केंद्र सरकारचा धक्का! सिलेंडरसाठी आता 1 हजार रुपये भरा

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
वाढत्या महागाईत सर्वसामान्यांना आणखी एक झटका मिळण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवसांत एलपीजी सिलेंडर महागण्याची शक्यता आहे. ग्राहकांना एलपीजी सिलेंडरसाठी 1000 रुपये मोजावे लागू शकतात. इतकंच नाही तर सरकार एलपीजी सिलेंडरवर मिळणारं अनुदानही रद्द करण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने केलेल्या अंतर्गत मूल्यांकनात ग्राहक एलपीजी सिलेंडरसाठी 1000 पर्यंत पैसे मोजण्यास तयार असल्याचं समोर आलं आहे. मात्र अद्याप केंद्र सरकारकडून यासंबंधी कोणताही अधिकृत माहिती दिली आहे.

रिपोर्टनुसार, एलपीजी सिलेंडरच्या अनुदानासंबंधी सरकार दोन भूमिका घेण्याची शक्यता आहे. यानुसार सरकार सध्याच्या योजनेत कोणतेही बदल करणार नाही किंवा उज्ज्वला योजनेंतर्गत आर्थिकदृष्या सक्षम नसणार्‍या ग्राहकांनाच अनुदान देण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. मात्र याबाबत अद्याप सरकारकडून कोणतीही स्पष्टता नाही.

आर्थिक वर्ष 2020-21 मधअये सरकारने अनुदान म्हणून ग्राहकांना 3559 कोटी रुपये दिले होते. 2019-20 मध्ये खर्चाचा हा आकडा 24 कोटी 468 इतका होता. म्हणजेच सरकारने एका वर्षात अनुदानामध्ये सहा पटीने कपात केली आहे. सध्याच्या नियमानुसार, जर तुमचं वार्षिक उत्पन्न 10 लाखांपेक्षा जास्त आहे तर तुम्हाला एलपीजी सिलेंडरवर अनुदानाची सुविधा मिळणार नाही. मे 2020 मध्ये काही ठिकाणी अनुदान बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

दिल्लीमध्ये 1 जानेवारीला एलपीजी सिलेंडरची किंमत 694 रुपये होती. आता सिलेंडरची किंमत 884 रुपेय 50 पैसे आहे. म्हणजेच जानेवारीपासून आतापर्यंत सिलेंडरच्या किंमतीत 190 रुपये 50 पैशांची वाढ झाली आहे. गेल्या साडे सात वर्षात घरगुती गॅल सिलेंडरची (14.2 किलो) किंमत दुपटीने वाढली आहे. मार्च 2014 ला 14.2 किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 410 रुपये 5 पैसे होती, जी आता 884 रुपये 50 पैसे आहे. भारतात जवळपास 29 कोटी लोकांकडे एलपीजी कनेक्शन आहे. यामध्ये उज्ज्वला योजनेंतर्गत येणार्‍यांची संख्या आठ कोटींच्या आसपास आहे.

Exit mobile version