40 हजारांचा दंड वसुलीचे निर्देश
पेण | संतोष पाटील |
मोटार वाहन कायद्यात दंडाची कमी असलेली तरतूद पाहता वाहनधारक सर्रास नियमांचे उल्लंघन करीत होते. शासनाने वाहनधारकांना शिस्त लावण्यासाठी सुधारीत मोटार वाहन कायदा अस्तित्वात आणला आहे. 1डिसेंबरपासून राज्यात मोटार वाहन (सुधारणा) अधिनियम 2019 ची अंमलबजावणी सुरु झाली आहे. त्यामुळे मालाची ओव्हरलोड वाहतूक करणार्यांनी दूसर्यांदा गुन्हा करण्याचा विचारच करु नये. अशी न परवडणारी मोठया दंडाची शिक्षा या नवीन कायद्यात आहे. परवानगी दिलेल्या वजनापेक्षा अधिक भाराचा माल वाहनात आढळून आल्
रायगड जिल्हयातील पेण तालुक्यातील लोखंड वाहतुकी दरम्यान राष्ट्रीय महामार्ग वरुन सर्वाधिक ओव्हरलोड वाहतुक करणारी वाहने दिसून येतात. पूर्वी अतिरिक्त भार वाहून नेणार्या वाहनांना पूर्वीच्या कायद्यात टनाच्या वजनानुसार दंड आकारला जात होता. या दंडाला वाहनमालक जुमानत नव्हते. दंड भरून मोकळे होणारे वाहनमालक वारंवार ओव्हरलोड वाहतुकीचा गुन्हा करीत होते. मात्र, त्याला आता चाप बसविण्याकरिता या नवीन कायद्याची अंमलबजावणी करण्यात आली आहे. एवढयावरच दंडाच्या शिक्षेला ब्रेक लागणार नसून, डीए (डिपार्टमेंड अॅक्शन) अर्थात विभागीय कारवाईत वाहनाच्या प्रकारानुसार अतिरिक्त भाराची शिक्षा म्हणून वेगवेगळया प्रकारच्या आर्थिक दंड आकारण्यात येईल त्यात दंडाची रक्कम भरण्यास तयार नसेल तर परवाना निलबंनाच्या कारवाईला तोंड द्यावे लागणार आहे.
पहिल्यांदा गुन्हा केल्यानंतर त्याच वाहनमालकाला वारंवार पकडल्यास त्यासाठी दंड आणि परवाना निलंबनाचे वेगवेगळे टप्पे पाडण्यात आले आहेत.
1 किलो असो वा 1 टन कारवाई अटळ
वाहन क्षमतेनंतर मालासाठी असलेल्या परवान्यापुढे 1 किलो वजन जरी जास्त भरले तर वाहनधारकाला 40 हजार रुपये दंड पडणार आहे. क्षमतेपेक्षा जास्त 1 किलोपासून पुढे जेवढे टन माल आढळून येईल त्यावर टनामागे 4 हजार रुपये आकारले जातील. शिवाय विभागीय कारवाईतील दंडची रक्कम ठोठावली जाणार आहे.
या नियमांतर्गत होणार कारवाई
मोटार वाहन कायद्यामध्ये सुधारणा करण्यात आली आहे. दंडाची रक्कम थेट 40 हजार रुपये करण्यात आली आहे. ज्यामध्ये वाहन चालकास 20 हजार आणि वाहन मालकाला 20 हजार रुपये अशी 40 हजार रुपये दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. मोटार वाहन कायदा 1988 चे कलम 94(1)नुसार ही कारवाई होणार आहे. विशेष म्हणजे या दंडाच्या तरतुदीत केवळ दिलेल्या वजनापेक्षा जास्त म्हणजे जेवढे टन माल असेल त्यापोटी प्रतिटन 4 हजार रुपये ( चालक 2 हजार व मालक 2 हजार) मोजावे लागतील. शासनाकडून लागू करण्यात आलेल्या या वाहतुकीच्या नव्या नियमांची रायगड जिल्हयात अंमलबजावणी कशी होईल, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
हप्ता वसुली नाविण्यपूर्ण
पेण तालुक्यात मोठया प्रमाणात लोखंडी पत्राची (कॉयल) वाहतुक ही ओव्हरलोड पद्धतीने होत असून एका गाडीमागे 3 हजारापासून 6 हजार रुपयापर्यंत महिन्याला हप्ता जमा केला जात असून हा हप्ता जमा करण्याची पद्धत नाविन्यपूर्ण आहे. यामध्ये प्रत्येक दलालाचा कोडवर्ड हा वेगळा असून उप प्रादेशिक परिवहन अधिकार्यापासून वाहन निरीक्षकापर्यंत प्रत्येकाचा हिस्सा हा ठरलेला असल्याने सर्रास ओव्हरलोड वाहतुक राष्ट्रीय महामार्गावरून होताना आपल्याला दिसते. परंतु त्यावर आरटीओ कार्यालयातून कारवाई होत नाही. मात्र नवीन नियमांनुसार वाहनांवर कारवाई होते की, लक्ष्मी दर्शनाचे प्रमाण वाढतेय, हे येणारा काळच ठरवेल.