| नागपूर | प्रतिनिधी |
राज्यातील सर्व दुकानं, हॉटेल्स आणि स्थापनं 24 तास सुरु ठेवता येणार आहेत. त्यामुळे व्यवसाय, अर्थव्यवस्था आणि पर्यटनाला चालना मिळणार आहे. महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्व दुकाने आता 24 तास खुली ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, काही दुकानांसाठी हा नियम लागू नसेल. मद्यपान गृहे, बार परमिट रूम, हुक्का पार्लर, देशी बार हे 24 तास सुरू राहणार नाहीत. तर इतर सर्व आस्थापना, खाद्यगृहं आणि दुकाने आता 24 तास सुरू राहतील. महाराष्ट्र दुकाने आणि आस्थापना 2017 हा अधिनियम सर्व दुकाने, निवासी हॉटेल, उपाहारगृहे, खाद्यगृहे, थिएटर्स, सार्वजनिक मनोरंजनाच्या किंवा करमणुकीच्या इतर जागा व त्यांच्याशी संबंधित किंवा बाबींकरीता तरतूद करण्यासाठी महाराष्ट्रात हा नियम लागू करण्यात आला आहे. दुकाने आठवड्यातील सर्व दिवस धंदा करण्यास खुली ठेवता येणार आहेत. मात्र, तरीही प्रत्येक कर्मचाऱ्यास आठवड्यातून 24 तास सलग विश्रांती मिळेल, साप्ताहिक सुट्टी देण्यात येईल, अशी तरतूद कायद्यात करण्यात आली आहे.







