आता बंडखोर अमोल कोल्हे बघाल; अजित पवारांना थेट आवाहन

। पुणे । प्रतिनिधी ।

शिवसिंहाची औलाद आहे, थांबणार नाही, अजून विधानसभा बाकी आहे, करारा जवाब मिलेगा. आतापर्यंत आज्ञाधारक अमोल कोल्हे बघितला, आता कफन बांधलेला बंडखोर अमोल कोल्हे बघाल, या शब्दांत महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना थेट आव्हान दिले.

डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचाराची सांगता सभा नारायणगावात भरपावसात झाली. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, जेव्हा एक भूमिका घ्यायची वेळ आली होती, तेव्हा स्वार्थासाठी सरटणार्‍यांच्या रांगेत जायचं नाही हे ठरवलं होतं. उपमुख्यमंत्र्यांना 12 सभा घ्याव्या लागत असतील, तर हा माझा गौरव आहे. पुढे अमोल कोल्हे म्हणाले, कडेवर घेतलेल्या उमेदवाराच्या प्रचारात पालकमंत्री व्यग्र आहेत. प्रचारातून बाहेर या आणि बिबट्याच्या प्रश्‍नांवर लक्ष द्या. बिबट्याचा प्रश्‍न हा माझ्या माणसांसाठी गंभीर प्रश्‍न आहे. कितीही नोटिसा पाठवल्या तरी प्रश्‍न विचारत राहणार. सभेत दाखवली नोटीसशिवाजीराव आढळराव पाटील हे संसदेत आपल्या कंपनीच्या फायद्यासाठी संरक्षण खात्याविषयी कसे प्रश्‍न विचारत होते, हे डॉ. कोल्हे यांनी पुराव्यांसह दाखवले. त्यानंतर त्यांच्याकडून डॉ. कोल्हे यांना कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली. ही नोटीस जाहीर सभेत दाखवत, कितीही नोटीस आल्या तरी त्याचा विचार करत नाही, कारण प्रश्‍न सर्वसामान्य जनतेचा आहे. जनहिताचे, लोकशाहीचे प्रश्‍न विचारत राहणार, असे सांगितले.

Exit mobile version