एनएसएसचे युवक देशाचे आधारस्तंभ- डॉ. विजय कोकणे

| रसायनी | वार्ताहर |

कौशल्य विकास व स्वच्छता उपक्रम आदींना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभाग जे.एस.एम कॉलेज व जे.एस.एस. रायगडच्या माध्यमातून प्लास्टिक बंदी जनजागृती उपक्रम राबवण्यात आला. याप्रसंगी गावकरी व एन.एस.एस स्वयंसेवक यांना कागदी व कापडी पिशव्या बनवण्याचे मार्गदर्शन मुख्य मार्गदर्शक डॉ. विजय कोकणे यांच्या माध्यमातून करण्यात आले. त्याचबरोबर सहाय्यक प्रशिक्षिका प्रतीक्षा चव्हाण यांनी उपस्थितांकडून सराव करून घेतला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रतीक्षा चव्हाण यांनी केले.

संस्थापक अध्यक्षा डॉ. मेधा किरीट सोमैया, अध्यक्ष डॉ. नितीन गांधी, उपाध्यक्ष रत्नप्रभा बेल्हेकर, संचालक डॉ. विजय कोकणे, जे.एस.एम कॉलेजचे अध्यक्ष डॉ. गौतम पाटील व प्राचार्य डॉ. सोनाली पाटील व व्यवस्थापक मंडळ यांच्या मार्गदर्शनातून भारत सरकारच्या कौशल्य विकास योजनेंतर्गत कार्यक्रम राबविण्यात आला. याप्रसंगी जनशिक्षण संस्थान रायगडचे संचालक डॉ. विजय कोकणे, कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रवीण गायकवाड, डॉ. पंकज घरत, प्रा. आश्‍विनी आठवले, प्रा. जयवंती झावरे व डॉ. अनिल डोंगरे, प्रतीक्षा चव्हाण (अकाऊंट मॅनेजर), हिमांशू भालकर हे कर्मचारी व स्वयंसेवक उपस्थित होते.

Exit mobile version