जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यप्रणालीवर खुश होऊन नागोठण्यातील असंख्य कार्यकर्ते शेकापमध्ये सामील झाले आहेत. शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शेकाप भवन येथे छोटेखानी कार्यक्रमात हा पक्ष प्रवेश सोहळा शनिवारी (दि.4) पार पडला. यावेळी शेकाप जिल्हा चिटणीस सुरेश खैरे, शेकापचे ज्येष्ठ नेते शंकरराव म्हसकर, रोहा तालुका चिटणीस शिवराम महाबळे, शेकाप जिल्हा चिटणीस मंडळाचे सदस्य तुकाराम खांडेकर (गुरूजी), तालुका चिटणीस सदस्य राजू तेलंगे, तालुका महिला आघाडी सदस्य समिक्षा यादव, तालुका मच्छिमार संघटना सदस्य नजीर रहेमान मोहने, सामाजिक कार्यकर्ते नजीर रहेमान आदी उपस्थित होते.
शेतकरी, कष्टकरी, कामगार व तळागाळातील वंचित घटकाला न्याय देणारा पक्ष म्हणून शेतकरी कामगार पक्षाची ख्याती आहे. सर्वसामान्यांना केंद्रबिंदू ठेवून शेकाप काम करीत आहे. त्यामुळे आजही शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यप्रणालीवर तळागाळातील घटकांना विश्वास आहे. नागोठणेमधील अजगर सय्यद, आरीन शेख, अफताब अत्तार, मुलीद कडवेकर, फरीद बोडेरे, मजर सय्यद, मोहसिन शेख, याकूब कडवेकर, सुजान गोडमे, साहिल सय्यद, आसीफ शेख, साहिल कोरतकर, आशा शेळके, कांचन कदम, पौर्णिमा महाडीक, जानवी शिर्के, संदीप शेळके, प्रफुल्ल शिंदे, समिर सय्यद, अरबाज कुरेशी आदींनी शनिवारी (दि.4) शेतकरी कामगार पक्षामध्ये प्रवेश केला. शेकाप नेते जयंत पाटील यांच्या हस्ते नवनिर्वाचित कार्यकर्त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
