| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
शेतकरी कामगार पक्षाच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांच्या कार्यप्रणालीवर खुश होत बोरघर ग्रामपंचायत सदस्या अश्विनी भगत यांच्यासह भिलजी गावातील असंख्य तरुण मंडळींनी शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला. नुकतेच अलिबागमध्ये नवनिर्वाचित कार्यकर्त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी बाळू पाटील, विक्रांत वार्डे, मोहन धुमाळ, मधुकर ढेबे, नवशाद मुजावर, उत्तम रसाळ, यशवंत भगत, अनंत पुनकर, महेश झावरे, विश्वनाथ झावरे, नितीन जानकर, अक्षय डिकले आदी शेकापचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नवनिर्वाचित कार्यकर्ते, महिला उपस्थित होत्या. अश्विनी भगत या गेल्या अनेक वर्षांपासून राजकारणात सक्रीय आहेत. गेली दहा वर्षे बोरघर ग्रामपंचायतीच्या सदस्य म्हणून कार्यरत आहेत. शेतकरी कामगार पक्षाच्या नेतृत्वावर खुश होऊन अश्विनी भगत यांनी त्यांचे पती प्रशांत भगत व इतर कार्यकर्त्यांनी शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला. सोमवारी (दि.8) रात्री वेश्वी येथील निवासस्थानी छोटेखानी कार्यक्रमात पक्ष प्रवेश सोहळा पार पडला.
बोरघरच्या असंख्य कार्यकर्त्यांचा शेकापमध्ये प्रवेश
