रत्नागिरीत नर्सिंगच्या विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचार

| रत्नागिरी | वृत्तसंस्था |

बदलापूरसह राज्यात इतर ठिकाणी अत्याचाराच्या घटना ताज्या असताना रत्नागिरीत नर्सिंगच्या विद्यार्थीनीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने संताप व्यक्त केला जात आहे. नर्सिंगचे शिक्षण घेणाऱ्या 20 वर्षांच्या तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना रत्नागिरीत घडली आहे. या घटनेने रत्नागिरीत खळबळ उडाली असून सरकारी रुग्णालयातील नर्सेसनी या घटनेचा निषेध करत आरोपीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

मन विषण्ण करणारी अशी ही घटना रत्नागिरीत घडली आहे. रत्नागिरीसारख्या ठिकाणी अशी घटना घडली आहे. हि तरुणी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घरातून निघाली होती. कॉलेजला येण्यासाठी निघालेल्या या तरुणीवर भर दिवसा झालेल्या या घटनेमुळे संतापाची लाट उसळली.  धक्कादायक बाब म्हणजे तरुणीवर लैंगिक अत्याचारानंतर ती बेशुद्धावस्थेत सापडली. तिला उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थीनींनी या घटनेनंतर सुरक्षेवर प्रश्न उपस्थित केला आहे. आम्हाला सुरक्षित वाटत होते पण अशा घटनेने आता भीती निर्माण झाली आहे. चुकीच्या गोष्टी घडत आहेत. लवकरात लवकर गुन्हेगाराला पकडून फाशी द्यावी अशी मागणी रुग्णालयातील नर्सेसनी केली. राज्यात अत्याचाराच्या घटना घडत असताना पोलीस प्रशासनाकडून तातडीने कारवाईच्या चर्चा होत आहेत. मात्र तरीही अशा घटना घडत असल्याने आम्ही शिकायचे की सुरक्षित आहे की नाही हा विचार करत बसायचे असा सवाल विद्यार्थीनींनी विचारला आहे. आज जी घटना घडली अतिशय वाईट घटना आहे. कॉलेजला येण्यासाठी निघालेल्या या तरुणीवर भर दिवसा झालेल्या या घटनेमुळे संतापाची लाट उसळली. आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी सरकारी रुग्णालयातील परिचारिका आणि कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले.

Exit mobile version