बहिरोळे अंगणवाडीत पोषण पखवाडा अभियान

| सोगांव | वार्ताहर |

महिला व बालविकास विभागातर्फे अलिबाग तालुक्यातील प्रत्येक अंगणवाडीमध्ये दि 1 ते 30 सप्टेंबर दरम्यान पोषण पखवाडा अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून पोषण रॅली, स्वच्छ हात धुणे, गरोदर मातांचे ओट भरण, गरोदर मातांचे सकस आहार आदी बाबतीत जनजागृती करण्यात आली. यावेळी पोषण रॅलीचे आयोजन, तसेच मुलांनी व पालकांनी हात कसे स्वच्छ धुवावे व आपले आरोग्य कसे निरोगी राहील याबद्दल माहिती देण्यात आली. या कार्यक्रमास बहिरोळे अंगणवाडी मदतनीस, टाकादेवी अंगणवाडी मदतनीस, सोगांव मराठी अंगणवाडी सेविका, सोगांव उर्दु अंगणवाडी सेविका व मदतनीस तसेच बहिरोळे आशा वर्कर, विद्यार्थी व त्यांचे पालक, गरोदर माता, महिला ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

Exit mobile version