। चिपळूण । प्रतिनिधी ।
प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेंतर्गत दि. 8 ते 25 एप्रिल या कालावधीत वालोटी नं.1 शाळेत पोषण पंधरवडा मोठ्या उत्साहात पार पडला. या उपक्रमांतर्गत शाळेत संतुलित आहार महत्व याबद्दल जनजागृती, आरोग्य संबंधी व्याख्यान, विद्यार्थी पोस्टर्स, लोककला, चित्रकला, निबंध लेखन, पौष्टिक आहार महत्व, घरचे आरोग्य दूत, परसबागेतील भाजीपाला, स्वच्छता मार्गदर्शन यासारखे उपक्रम तसेच पालक विद्यार्थी यांच्या सहकार्याने पदार्थांचे प्रदर्शन भरवण्यात आले. त्यामध्ये नाचणीचे लाडू, नाचणीचे कटलेट, नाचणी कुरड्या, काजूची भाजी, माठाची भाजी, पालक भाजी, गव्हाची खीर, बटाट्याचे काप, मेथीचे लाडू भाकरी, पराठा, मोड आलेली कडधान्य, सलाड तसेच इतर सर्व पदार्थांची मांडणी सदर प्रदर्शनात करण्यात आली. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा आराध्या कदम, उपाध्यक्ष विलास धुमक, उपसरपंच सचिन बामणे, सदस्या दिक्षा कदम, साक्षी आंबेडे, प्रज्ञा कांगणे आदी उपस्थित होते.






