। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
न्यायमूर्ती डी.वाय. चंद्रचूड यांनी देशाचे 50 वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. धनंजय चंद्रचूड आगामी दोन वर्षे सरन्यायाधीश म्हणून न्यायदानाचे काम करतील. 10 नोव्हेंबर 2024 रोजी ते या पदावरून निवृत्त होतील. धनंजय चंद्रचूड यांचे वडीलदेखील देशाचे सरन्यायाधीश होते.
धनंजय चंद्रचूड हे दिवंगत माजी सरन्यायाधीश वाय.व्ही. चंद्रचूड यांचे पूत्र आहेत. वाय व्ही चंद्रचूड यांनी सात वर्षे देशाचे सरन्यायाधीश म्हणून न्यायदान केलेले आहे. त्यांनी याआधी अयोध्येतील बाबरी मशीद तसेच गोपनियतेचा अधिकार यासह अनेक महत्त्वाच्या खटल्यांमध्ये न्यायदानाचे काम केले आहे.