| खरोशी | प्रतिनिधी |
राष्ट्रीय ओबीसी शिक्षक संघाची महत्त्वपूर्ण बैठक तुळजापूर येथे उत्साहात पार पडली. या बैठकीत संघटनेच्या बळकटीकरणासाठी आवश्यक असलेल्या विविध संघटनात्मक बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीत शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत आढावा घेण्यात आला.
ओबीसी शिक्षकांच्या हक्कांसाठी प्रभावीपणे काम करण्यासाठी संघटनेची रचना अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात आला. आगामी काळातील उपक्रम, सदस्य नोंदणी वाढवणे, तालुका व जिल्हास्तरीय कार्यकारिणी अधिक सक्रिय करणे, तसेच शिक्षकांच्या शैक्षणिक व प्रशासकीय अडचणी शासन दरबारी मांडण्याबाबत चर्चा झाली. यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी संघटनेच्या ध्येयधोरणांची माहिती देत एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले. शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी संघटना कटिबद्ध असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. या बैठकीला संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठक यशस्वीरीत्या पार पडल्याने संघटनेच्या कार्याला नवचैतन्य मिळाल्याची भावना उपस्थितांमध्ये दिसून आली. सदरची सभा संघटनेचे मार्गदर्शक माजी शिक्षक आ. कोकण विभाग बाळाराम पाटील ॲड. बी. एल. सगर किल्लारीकर माजी सदस्य राज्य मागासवर्गीय आयोग महाराष्ट्र राज्य, यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अनिल नाचपल्ले, सरचिटणीस संतोष भोजने, उपाध्यक्ष सुखदेव भालेकर, धाराशिव जिल्हाध्यक्ष अनंत फुलसुंदर आदी पदाधिकारी उपस्थित होते.







