पेण नगरपालिकेचे ओबीसी आरक्षण जाहीर

। पेण । वार्ताहर ।
रायगड जिल्ह्यातील नऊ नगरपरिषदांचे ओबीसी आरक्षण जाहीर झाले असून, पेण नगरपालिकेचा त्यात समावेश आहे. पेण. न.प.च्या 12 प्रभागांमध्ये 24 जागांचे आरक्षण जाहीर झाले आहे. प्रभाग क्र.1-1 अ महिला ना.मा.प्र., 1 ब सर्वसाधारण, प्रभाग क्र.2-2 अ महिला खुली, 2 ब ना.मा.प्र सर्वसाधारण, प्रभाग क्र.3-3 अ महिला खुली, 3 ब ना.मा.प्र. सर्वसाधारण, प्रभाग क्र. 4-4 अ महिला खुली, 4 ब सर्वसाधारण, प्रभाग क्र.5-5 अ महिला ना.मा.प्र., 5 ब सर्वसाधारण, प्रभाग क्र. 6 अ महिला खुली, 6 ब अनुसूचित जाती सर्वसाधारण, प्रभाग क्र. 7-7 अ महिला खुली, 7 ब सर्वसाधारण, प्रभाग क्र. 8-8 अ महिला खुली, 8 ब सर्वसाधारण, प्रभाग क्र. 9-9 अ महिला खुली, 9 ब सर्वसाधारण, प्रभाग क्र. 10-10 अ महिला खुली, 10 ब ना.मा.प्र. सर्वसाधारण, प्रभाग क्र. 11-11 अ महिला खुली, 11 ब अनुसूचित जमाती सर्वसाधारण, प्रभाग क्र.12-12 अ महिला ना.मा.प्र., 12 ब सर्वसाधारण असे आरक्षण आहे. या आरक्षणामुळे इच्छुक उमेदवारांची नक्कीच धाकधूक वाढली आहे.

पेण नगरपालिकेच्या सभागृहामध्ये प्रांतधिकारी विठ्ठल इनामदार यांच्या अध्यक्षतेखाली प्रभागातील आरक्षणाची सोडत काढण्यात आली. यावेळी मुख्याधिकारी तथा प्रशासकीय अधिकारी जीवन पाटील, प्रशासन अधिकारी राजाराम नरूटे, नगरपालिका कर्मचारी, तसेच राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.

Exit mobile version