अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे

। महाड । प्रतिनिधी |

महाड शहरात शाळकरी अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन केल्याच्या आरोपावरून एका तरुणाविरोधात महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीला संबंधित मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती होती. असे असतानाही तो तिचा मोटारसायकलवरून पाठलाग करीत असल्याचा आरोप आहे. तसेच अश्लील हावभाव करणे आणि मुलीच्या इच्छेविरुद्ध तिच्या शरीराला स्पर्श करून तिच्या मनात लज्जा निर्माण होईल, असे कृत्य केल्याची तक्रार पोलिसांकडे करण्यात आली. या प्रकरणी अम्मार नसिम इसाने रा. वहूर याच्याविरोधात महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपीला अटक केली. घटनेची माहिती समोर आल्यानंतर महाड शहरात या प्रकाराबाबत संताप व्यक्त होत असून, आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप काळे यांच्या मार्गदर्शनाखाली महाड शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक नारायण एकशिंगे करीत आहेत.

Exit mobile version