। अलिबाग । प्रतिनिधी ।
शाळेतून रेवदंडा बसस्थानकात चालत जाणार्या दोन विद्यार्थिनींना रस्त्यात गाठून त्यांच्यासोबत अश्लील हावभाव केल्याचा प्रकार समोर आला आहे. या रोडरोमिओंविरोधात रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी सायंकाळी घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळी शाळा सुटल्यानंतर दोन विद्यार्थिनी रेवदंडा एसटी बसस्थानकाकडे चालत जात होत्या. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास गोळा स्टॉपजवळील सुरभी हॉटेलसमोर आल्यावर एका दुचाकीवरून दोघेजण आले. त्यांनी त्या विद्यार्थिनींचा रस्ता अडवला. त्यांच्यासोबत अश्लील हावभाव करण्यात आले. ही बाब विद्यार्थिनींनी पालकांच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर रेवदंडा पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला.