बसस्थानकाला गतिरोधकाचा अडथळा

डिझेल टँक फुटून एसटीचे नुकसान
आंबेत | वार्ताहर |
म्हसळा तालुक्यातील आंबेत एसटी बसस्थानक बसेसचे नुकसान करण्यास कारणीभूत ठरत आहे. मंडणगडहून मुंबईला जाणार्‍या बोरथाल मुंबई एसटी बसला या स्थानकातील उंच बांधण्यात आलेल्या प्रवेशद्वारावरील गटार लाईनच्या भागामुळे अपघात झाला. यामध्ये एसटी बसेसची डिझेल टाकी फुटून अतोनात नुकसानदेखील झाले. याबरोबरच प्रवाशांचादेखील दोन तास खोळंबा झाला.
बसस्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारावर असलेल्या गटार लाईनवर बांधण्यात आलेल्या गतिरोधकाचा भाग बराचसा उंच असल्याकारणाने येथील स्थानकात जाणार्‍या बसेसचा खालचा भाग संपूर्ण या गतिरोधकांना घासत असून, बसच्या डिझेल टँकसोबत इतर भागांचे देखील मोठे नुकसान होत आहे. यामुळे एसटी महामंडळच हे स्वतःच्याच मालकीचे नुकसान करून घेत असल्याचा आरोप प्रवासी करीत आहेत. त्यामुळे लवकरात लवकर हे गतिरोधक कमी करून त्याजागी नवीन काम करण्यात यावे, अशी वाहनचालकांनी मागणी केली आहे.

Exit mobile version