पीक पाण्यांच्या नोंदी करण्यात अडथळे

कर्जत तालुक्यातील शेतकरी चिंताग्रस्त; किसान क्रांती संघटनेचे तहसीलदारांना निवेदन

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यात शेतकऱ्यांना पीक पाण्यांच्या नोंदी ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुरुवात करण्यात आली आहे. ग्रामीण भागात मोबाईल नेटवर्कमधील अडचणी यामुळे शेतकऱ्यांना पिकांची नोंदणी करण्यात अडथळे येत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना नोंदी करण्यात येत असलेल्या अडचणी लक्षात घेऊन किसान क्रांती संघटनेने कर्जत तहसीलदार यांना निवेदन देऊन शेतकऱ्यांच्या नोंदी तलाठी आणि कृषी सहायक यांच्या माध्यमातून घालून देण्यासाठी मदत करण्याची मागणी केली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या प्रगत शेतीविषयक धोरणामध्ये काही तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. शेतकरी आणि शासन यांच्यात थेट संपर्क व्हावा ह्या उद्देशाने सरकारने आधुनिक अशा संगणकीय तंत्रज्ञानाचा वापर करत शेतीविषयी शेतकरी ओळख पत्रापासून तर शेतात उभ्या असलेल्या पिकांची विविध नोंदी करण्या बाबत संगणकाचा वापर करत आहेत. विविध ॲपची निर्मिती करत केवळ सदर ॲपच्या माध्यमातून नोंदी अनिवार्य केले असले तरी मात्र सर्वसामान्य शेतकऱ्यांपुढे एक बिकट अशी समस्या निर्माण झाली आहे. सदर ॲपद्वारे पिकांच्या विविध नोंदी करत असताना काही तांत्रिक कारणांमुळे सदर ॲप नोंदी स्वीकारण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर शासनाने प्रतीत केलेल्या निर्धारित वेळेत नोंदी करण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत. हि स्थिती सर्वत्र दिसत असून तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांस शेतीविषयी मिळणाऱ्या लाभापासून वंचित रहावे लागत आहे. परिणामी संपूर्ण तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेच आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

शेतकऱ्यांची हि समस्या लक्षात घेऊन किसान क्रांती संघटना यांच्याकडून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. शेतकऱ्यांच्या शेतात सध्या पीक शेतकऱ्यांना आपल्या पिकाच्या नोंदी करण्यात अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे शासनाने कृषी सहायक, ग्रामपंचायत अधिकारी आणि तलाठी यांच्या माध्यमातून या नोंदी घालण्यासाठी मदत करावी अशी मागणी केली आहे. या आशयाचे निवेदन देण्यासाठी किसान क्रांती संघटनेचे तालुका भरत राणे, तालुका उपाध्यक्ष शरद तवले,तालुका सल्लागार साधुराम पाटील, तसेच अनेक शेतकरी उपस्थित होते. यावेळी जिल्हा संघटक रमेश जाधव यांनी तात्काळ अशेतकऱ्याच्या हिताच्या मागणीची अंमलबजावणी व्हावी अशी मागणी केली.

शेतकरी चिंताग्रस्त
सर्वसामान्य शेतकऱ्यांपुढे एक बिकट अशी समस्या निर्माण झाली आहे. सदर ॲपद्वारे पिकांच्या विविध नोंदी करत असताना काही तांत्रिक कारणांमुळे सदर ॲप नोंदी स्वीकारण्यास अडचणी येत आहेत.
Exit mobile version