कर्जतमधील शेतकर्यांनी दिले निवेदन
। नेरळ । प्रतिनिधी ।
शासनाच्या आधारभूत भात खरेदी केंद्रावर हमी भावाने भात देण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करण्याची करावी लागते. शेतकर्यांना नावनोंदणी करण्यासाठी अडचणी येत असल्याने शासनाने ऑनलाईन नोंदणीची मुदतवाढ द्यावी आणि हमी भावाने भाताची खरेदीला मे 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात यावी या मागणीसाठी कर्जत तालुक्यातील शेतकर्यांनी तहसीलदारांना निवेदन दिले. यावर्षीपासून शासनाने भाताचे हमी भाताची हमी भावाने खरेदी करण्यासाठी ऑनलाईन केली आहे. हि ऑनलाईन कार्यपद्धती शेतकर्यांसाठी अडचणीची ठरत असल्याने त्या ऑनलाईन पद्धतीला शासनाने डिसेंबर अखेर पर्यंत मुदतवाढ दिली आहे. मात्र यावर्षी पाऊस लांबल्याने शेतीची कामे नोव्हेंबर पर्यंत सुरु होती. त्यामुळे शेतकर्यांना निर्धारित वेळत ऑनलाईन नोंदणी करता आली नाही. त्यामुळे कर्जत तालुक्यातील भाताची विक्री करण्यासाठी ऑनलाईन नोंदणीसाठी फेब्रुवारी 2022 पर्यंत शेतकरी यांनी एकत्र येऊन ऑनलाईन नोंदणीला मुदतवाढ देण्याची मागणी प्रगत शेतकरी शशिकांत मोहिते, जयवंत शेळके आणि हरिचंद्र वेहले यांनी कर्जतचे तहसीलदार यांनी केली आहे.