न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली
| रसायनी | वार्ताहर |
शेतकर्यांच्या शेतजमिनीकडे जाण्या-येण्याचा पूर्वीपासूनचा रस्ता व बैलगाडी रस्ता बांधकाम करुन अडविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सदर रस्त्यामध्ये खोदकाम करुन अडविण्याचा प्रयत्न केल्याचे शेतकर्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, रस्त्याच्या मध्ये करण्यात आलेले बांधकाम मंडळ अधिकारी व रसायनी पोलिसांच्या बंदोबस्तात काढण्यात येईल, असे आश्वास तहसीलदार आयुब तांबोळी यांनी दिली.
तळेगाव येथील सर्व्हे क्र.19/9 व 17/2 तसेच घर क्र.294 या मिळकतीत जाण्या-येण्याकरिता खोदकाम करुन अडविलेला रस्ता पुन्हा स्वखर्चाने पूर्ववत करुन द्यावा, असे आदेश महसूल व वन विभाग तहसीलदार यांच्यावतीने 13/06/2022 रोजी पारित करण्यात आले होते.परंतु, सदर आदेशाची पूर्तता झाली नाही. याबाबत मामलेदार अधिनियम 1906 चे कलम 21 अन्वये सदर अडथळा काढण्याचे काम वासांबे मंडळ अधिकारी व रसायनी पोलीस यांच्या देखरेखीखाली करण्यात येईल, असे आदेश तहसीलदार आयुब तांबोळी यांनी दिले होते. याबाबत रायचंद मोतीराम पाटील, रा. तळेगाव यांच्या सर्व्हे क्रमांक-19/9 या शेतजमिनीकडे जाण्या-येण्यासाठी पायवाट व बैलगाडी जाणारा रस्ता सुवर्णा सुरेश मांडे व अभिजित सुरेश मांडे, रा. तळेगाववाडी यांनी बंद करण्याचा प्रयत्न करुन बांधकाम सुरु केले आहे. त्यामुळे रायचंद मोतीराम पाटील यांनी मामलेदार कोर्ट अॅक्ट 1906 चे कलम 5 अन्वये रस्ता मिळणेकामी अर्ज दाखल केला असता प्रस्तुत दाव्यामध्ये न्यायालयात सुनावणी घेण्यात आली. यात वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीने मालमत्ता क्रमांक-289 ही 464.27 इतक्या क्षेत्राची नोंद कोणतेही बांधकाम नसताना बेकायदेशीरपणे केल्याचे उघड झाले. ही जमीन महाराष्ट्र शासनाची असतानाही सुवर्णा सुरेश मांडे व अभिजित सुरेश मांडे, रा. तळेगाववाडी यांनी न्यायालयाचे आदेश झुगारुन बांधकाम सुरु केले आहे.
तळेगाव-तळेगाववाडी येथील महाराष्ट्र शासनाच्या जागेत वासांबे ग्रामपंचायतीने सन 2008 ते सन 2022 मध्ये सरपंच व ग्रामसेवक यांनी संगनमताने अनेकांना असेसमेंट दिले आहेत.
रामचंद मोतीराम पाटील,
तळेगाव
सर्व्हे नं-19/1 व 17/2 तसेच घर मिळकत क्र.294 या जमीन मिळकतीमध्ये जाणे-येणेकरिता खोदकाम करुन बंद केलेला रस्ता पूर्ववत करुन द्यावा.
आयुब तांबोळी,
कार्यकारी दंडाधिकारी तथा तहसीलदार खालापूर