| पाली / वाघोशी । वार्ताहर ।
माघी गणेशोत्सव निमित्ताने पाली बल्लाळेश्वर येथे मोठा उत्सव साजरा करण्यात येतो. या उस्तवाला तालुक्याच्या कानाकोपर्यातून भाविक उपस्थित राहतात. उत्सवानिमित्त संपूर्ण पालीची सजावट केली जाते. उत्सवाच्या तीन दिवस पालीची शोभा वाढत असते. मात्र यावर्षी राजकीय पुढार्यांच्या अनधिकृत होर्डिंगने उत्सवाच्या सजावटीला गालबोट लागले असून जुना एसटी स्टँड चौकात विविध पक्षाच्या पुढार्यांनी तीन राजकीय होल्डिंग कमानी लावल्या आहेत.
रस्ता अरुंद असून देखील होर्डिंग लावल्याने एसटी ट्रक व इतर वाहनांना प्रवास करताना होर्डिंगला घासून प्रवास करावा लागतोय. तर जुना एसटी स्टँड ते गणपती मंदिर पर्यंत सजावट केलेल्या जागेवर या राजकीय पुढार्यांनी फ्लेक्स लावले आहेत. उत्सवासाठी आलेले भाविक राजकीय पुढार्यांचे फ्लेक्स बघतील का उस्तवाची सजावट बघतील असा प्रश्न उभा राहिला आहे. नगरपंचायतीने हे होर्डिंग तातडीने उतरून गणेश उत्सवाची शोभा वाढवावी अशी येथील स्थानिकांची इच्छा आहे.