| श्रीवर्धन | वार्ताहर |
रायगड जिल्ह्यातील सर्व ज्येष्ठ नागरिक संघांनी 1 ऑक्टोबर हा जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन आपापल्या संघांमध्ये साजरा करावा, असे आवाहन रायगड जिल्हा ज्येष्ठ नागरिक संघाच्या समन्वय समितीचे अध्यक्ष सुरेश पालकर यांनी केले आहे. या कार्यक्रमाला आपापल्या विभागातील प्रांताधिकारी, तहसीलदार, पोलीस अधिकारी यांना आमंत्रित करुन त्यांना केंद्र व राज्य सरकारने ज्येष्ठांसाठी जाहीर केलेल्या योजना, सोयी-सवलती याबाबत मार्गदर्शन करण्यास सांगावे. तसेच जिल्हा स्तरावर कार्यरत असलेली केंद्रीय सुरक्षा समितीची कर्तव्ये जाणून घ्यावीत. तसेच ज्येष्ठांच्या अनुभवांचे कथन त्यांच्या मनोगतातून व्यक्त करण्यास सांगावे, असेही ते म्हणाले.