| पनवेल | वार्ताहर |
पोटात चाकू भोसकून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी नक्कीब अहमद सय्यद उर्फ लकी याच्या विरोधात कळंबोली पोलीस ठाण्यात कलम 307 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
शंकर सिंग रामदरस सिंग हे गाडी दुरुस्तीचे काम करतात. हे नक्कीब अहमद सय्यद याला चांगल्या प्रकारे ओळखतात. तो पार्किंग परिसरात लहान सहन काम करतो. 12 जानेवारी रोजी शंकर सिंग डीव्ही कंपनी पळस्पे येथून मेकॅनिकचे काम करून संध्याकाळी प्रकाश मिस्त्री यांना भेटण्यासाठी रोडपाली येथे आला व पायी चालत अल्विया ऑटोमोबाईल च्या समोर सेक्टर 10 इ, ओझा यांच्या पार्किंग जवळ रोडपाली येथे आला. त्या ठिकाणी नक्कीब अहमद सय्यद हा आला आणि इकडून का चालला आहे असे बोलू लागला. या ठिकाणाहून गेल्यास तुला मारून टाकेन असे बोलल्यावर त्याने धक्काबुक्की केली. यावेळी शंकर सिंग यांनी देखील त्याला धक्काबुक्की केली. यावेळी नक्कीब अहमद याने खिशातून चाकू काढला व शंकर सिंग यांच्या पोटात जोरात भोसकला व तो तेथून पळून गेला. यात शंकर सिंग हे जखमी झाले. त्यांना एमजीएम हॉस्पिटल, कामोठे येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.






