विविध पदाधिकार्यांची नियुक्ती
| बोर्लीपंचतन । वार्ताहर |
रायगड जिल्ह्यातील छावा क्रांतिवीर सेनेच्या पदाधिकार्यांचा मेळावा पनवेल तालुक्यातील शिरढोण येथील क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके सभागृहात आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन करण्यात आली. जिल्हा अध्यक्ष रोशन पवार यांनी पदाधिकार्यांना मार्गदर्शन केले. जितेंद्र ठाकूर यांना उपजिल्हाध्यक्षपदी पदोन्नती देण्यात आली. अशोक घरत, दिलीप साळवी, सुरेश जाधव,विजय गावंड,नरेंद्र देशमुख, निलेश पवार, प्रसाद खाने,विकास घोरपडे, कृष्णा वाघमारे यांना पदनियुक्ती पत्र देऊन गौरविण्यात आले.
याप्रसंगी संघटनेचे विशाल देशमुख, आदित्य वाघ, शैलेश घरत, हनुमंत भोईर, राजेश मोकल, करण सोलंकी, संजय पवार, दीपक संसारे, भानुदास जांभळे, शरद बडेकर, प्राजक्ता थळे उपस्थित होते.