माणगाव पत्रकार संघाची कार्यकारणी जाहीर

| माणगाव | वार्ताहर |

माणगाव तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी माणगाव येथील ज्येष्ठ पत्रकार सलीम मुबारक शेख यांची संघाच्या अध्यक्षपदी सलग सातव्यांदा बिनविरोध फेरनिवड करण्यात आली. त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात येत आहे. तालुका पत्रकार संघाची सभा सोमवार दि.1 जानेवारी 2024 रोजी शासकीय विश्रामगृह माणगाव याठिकाणी आयोजित करण्यात आली होती. या सभेत संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक खेमचंद मेथा यांच्या सूचनेनुसार तीन वर्षांकरिता नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. त्यास ज्येेष्ठ पत्रकार प्रभाकर मसुरे यांनी अनुमोदन दिले. संघाच्या कार्यध्यक्षपदी मजिद हाजिते, उपाध्यक्षपदी प्रभाकर मसुरे, संतोष गायकवाड, सचिव सचिन देसाई, सहसचिव स्वप्ना साळुंके, खजिनदार निलेश म्हात्रे, खेमचंद मेथा, सुभाष दळवी, आजेश नाडकर, कायदेशीर सल्लागार अ‍ॅड. केदार गांधी, अ‍ॅड. सदफ येलुकर, देवयानी मोरे यांची निवड करण्यात आली.

Exit mobile version