। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
भाजप नव्हे, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हेच शिवसेनेचे खरे शत्रू आहेत, अशी टीका महाड-पोलादपूरचे शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांचे पूत्र आणि शिवसनेने युवानेते विकास गोगावले यांनी गुरुवारी केली. ज्यांचा आधार घेऊन शिवसेना सत्तेता आली त्याच दोन मित्रपक्षांवर टीका केल्याने महाविकास आघाडीतील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत.
यापुढे गोगावले म्हटले की, मतदार संघात भाजपच्या मतांची टक्केवारी किरकोळ आहे. शिवसेनेचे कार्यकर्ते येथे पक्षाचा विस्तार करत आहेत. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या कामाचे श्रेय राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष घेत असल्याने तेच आमचे खरे शत्रू आहेत. त्या दोन्ही पक्षांचा आघाडी संपवण्याचा प्रयत्न सुरू आहेत.राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत काँग्रेसचे चार माजी नगरसेवक आणि शिवसेनेच्या एका नगरसेवकाने गेल्या महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आम्ही आमची आघाडी वाचवण्याचा प्रयत्न करत आहोत, पण ते बिघडवण्याचे काम करत आहेत, असे विकास गोगावले म्हणाले.