। नागपूर । वृत्तसंस्था ।
नागपुरात भरधाव बसची धडक लागून एका वृद्धाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
भरधाव असलेल्या एका बसने 60 वर्षांच्या वृद्ध व्यक्तीला धडक दिली. या धडकेने तोल गेला आणि वृद्ध खाली पडून बसच्या मागच्या चाकाखाली गेल्याने वृद्ध व्यक्ती गंभीर जखमी झाली. उपचारासाठी जखमी व्यक्तीला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाला होता.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी हजर झाले. पोलिसांना बसची ओळख पटली असून बसचालकाचा शोध सुरू आहे.