। वावोशी । वार्ताहर ।
खालापूर तालुक्यातील मौजे कारगाव येथील 91 वर्षीय शंकर शिवराम मुसळे हे सोमवारी (दि.14) दुपारी 2.30 वाजता साजगाव येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात देवदर्शनासाठी जातो, असे सांगून घरातून बाहेर पडले. मात्र, त्यानंतर ते अद्याप घरी परतले नसून त्यांचा काहीच तपास लागलेला नाही.
शंकर मुसळे यांच्या कुटुंबीयांनी आणि मित्रमंडळींनी सर्वत्र शोध घेतला. मात्र त्यांचा ठावठिकाणा लागत नसल्याने कुटुंबीयांनी खालापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या घटनेचा तपास पोलीस अधिकारी गेंड करीत आहेत. शंकर मुसळे यांनी अंगात शर्ट-पँट, डोक्यावर पांढरी टोपी घातली असून हातात लाकडी काठी असल्याचे वर्णन कुटुंबीयांनी नमूद केले आहे. जर कोणी या वयोवृद्ध व्यक्तीला कुठे पाहिले असेल तर त्वरित आकाश मुसळे (मो. 8888622492) किंवा प्रशांत मुसळे (मो. 8411068020) तसेच खालापूर पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा, असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.