ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या पिल्लांना जीवदान

| आगरदांडा | प्रतिनिधी |

मुरुड समुद्राकिनारावर ऑलिव्ह रिडले कासव जातीच्या पिल्लांना सर्पमित्र संदिप घरत यांनी मंगळवारी रात्री समुदी अधिवासात सोडून जीवदान देण्यात आले. दोन महिन्यांपूर्वी मुरुड समुद्रकिनारी ऑलिव्ह रिडले प्रजातीची मादी दिसून आली. ती अंडी टाकण्याकरिता आली असावी. ती मादी सुरक्षीत राहण्या याकरिता समुद्राकिनारावराच नियोजन करून त्याठिकाणी दोन फुट खड्डा खोदून चार बाजूनी कुपन घालण्यात आले. दुसर्‍या दिवशी मादीनी खड्डायात अंडी घालुन समुद्रात निघून गेली. या संदर्भांची माहिती वनविभागाचे अधिकारी मनोज वाघमारे, मुरुड नगरपरिषदे -प्रशासक तथा मुख्याधिकारी-पंकज भुसे, मुरुड तहसीलदार- रोहन शिंदे यांना कळविण्यात आले होते.

दोन महिन्यांनंतर मंगळवारी रात्रीच्या दरम्यान अंड्यातून पिल्ल बाहेर आल्यानंतर खड्ड्यातुन पिल्लं बाहेर येऊ लागली. पिल्लांना कुत्र्यापासुन सुरक्षीत करीत रात्रीच्या वेळी घरत यांनी पिल्लांना समुदी अधिवासात सोडून जीवदान देण्यात आले

Exit mobile version