किक बॉक्सिंग स्पर्धेत ओम पाटीलचे यश

| उरण | वार्ताहर |

किक बॉक्सिंग हा एक लढाऊ खेळ आहे, जो केवळ हाताने खेळला जातो. या खेळातून आपल्या मनावरील ताणतणाव दूर होऊन स्मरणशक्ती वाढते आणि झोप चांगली लागते. अशा किक बॉक्सिंग खेळात श्रीमती भागूबाई चागू ठाकूर द्रोणागिरी नोड या विद्यालयात इयत्ता 8 वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या ओम पाटीलने तालुका, जिल्हा आणि पुणे येथील राज्यस्तरावर घवघवीत यश मिळवले.

ओम हा लहानपणापासून अभ्यासाबरोबरच, किक बाँक्सिंग या खेळांची आवड आहे. त्याला किक बाँक्सिंग स्पर्धेत तालुका, जिल्हा आणि पुणे येथील राज्यस्तरावर घवघवीत यश मिळविले असून आँलम्पिक स्पर्धेत सहभाग घेऊन देशासाठी गोल्ड मेडल जिंकण्याचा त्याचा मानस आहे. ओम पाटील याच्या या यशाबद्दल श्रीमती भागूबाई चागू ठाकूर विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ओम पाटील व त्यांचे आई वडील यांचा नागरी सत्कार करण्यात आला.

Exit mobile version