जावटे क्रिकेट स्पर्धेत ओम साईराम अव्वल


| सुतारवाडी | वार्ताहर |

नवतरुण विकास मित्र मंडळ जावटे आयोजित खुले ओव्हर आर्म क्रिकेट सामने भोसले मैदान जावटे येथे आयोजित केले होते. या सामन्यात ओम साईराम अंधेरी संघाने प्रथम पटकावला, तर द्वितीय क्रमांक शिवोदय स्पोर्ट क्लब जामगाव, तृतीय क्रमांक सारस इलेव्हन भाले, चतुर्थ क्रमांक घोटवल यांनी पटकावला. कार्यक्रमास बाबु खानविलकर, दत्ताराम खांबे, उपेंद्र जाधव, राजेश ढोकरे, लिंबाजी चिविलकर, विवेक खानविलकर, प्रकाश शेपोंडे, वामन शेपोंडे, वैशाली शेपोंडे, संतोष चिविलकर, सदानंद शेपोंडे, सुभाष राणे, संजोग मानकर, नवतरुण विकास मित्र मंडळ जावटेचे अध्यक्ष नंदकुमार चिविलकर, उपाध्यक्ष विजय बाळाजी चोपडे तसेच मंडळाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. सामने यशस्वी करण्यासाठी सर्व पदाधिकारी, ग्रामस्थ यांनी परिश्रम घेतले. समालोचन योगेश जाधव यांनी केले.

Exit mobile version