ओम् श्री साईनाथ सेवा ट्रस्ट कबड्डी स्पर्धा

विजय बजरंग, जागृती, पंचगंगा, यांची विजयी सलामी

| मुंबई । प्रतिनिधी ।
विजय बजरंग, जागृती, पंचगंगा, श्री साई यांची श्री साईनाथ सेवा ट्रस्ट मंडळाने आयोजित केलेल्या पुरुष द्वितीय श्रेणी स्थानिक गटात विजयी सलामी दिली. प्रभादेवी येथील समुद्र किनारी असलेल्या मंडळाच्या पटांगणावर आज पासून सुरू झालेल्या उदघाटनिय सामन्यात विजय बजरंग क्रीडा मंडळाने अमर क्रीडा मंडळाला 45-20 असे सहज पराभूत केले.

पंचगंगाने चुरशीच्या लढतीत गणेश क्लबला 29-24 असे नमवित आगेकूच केली. पहिल्या डावात एकमेकांच्या खेळाचा अंदाज घेत दोन्ही संघांनी सावध खेळ केला. त्यामुळे मध्यांतराला 9-8 अशी नाममात्र आघाडी पंचगंगाकडे होती. दुसर्‍या डावात जोशपूर्ण खेळ करीत पंचगंगाने पाच गुणांच्या फरकाने विजय साकारला.

Exit mobile version