| मुंबई । प्रतिनिधी ।
शिवशक्ती-धुळे, डॉ.शिरोडकर, विश्वशांती, स्वामी समर्थ यांची बंड्या मारुती सेवा मंडळ आयोजित आमदार चषक स्थानिक पुरुष-महिला गट कबड्डी स्पर्धेच्या महिला गटात विजयी सलामी. पुरुषांत जयभारत, गुड मॉर्निंग, गोलफादेवी, स्वस्तिक, सत्यम सेवा, मिड-लाईट, विजय क्लब, शिवशंकर यांनी साखळीत पहिल्या विजय नोंदविला. ना. म. जोशी मार्ग येथील श्रमिक जिमखाना येथे सुरू झालेल्या महिलांच्या क गटात धुळ्याच्या शिवशक्तीने ठाण्याच्या माऊली प्रतिष्ठानचा 38-30 असा पराभव करीत या उदघाटनिय सामन्यात विजयी सलामी दिली.