| सुधागड-पाली | प्रतिनिधी।
सुधागड तालुक्यातील आपटवणे गावचा सुपुत्र ओंकार शरद चोरघे याची भारतीय हवाईदलामध्ये airman (Medical assistant) पदासाठी संपूर्ण भारतातून प्रथम क्रमांकाने निवड झाली आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल त्याचे हार्दिक अभिनंदन करण्यात येत असून पुढील वाटचालीस शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. ओंकारच्या या यशामुळे सुधागड तालुक्याचा गौरव वाढला असून गावकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. भारतीय हवाईदलात वैद्यकीय सहाय्यक पदावर प्रथम क्रमांकाने निवड होणे ही अभिमानास्पद बाब मानली जात आहे. त्याच्या पुढील सेवाकार्यासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी संपूर्ण सुधागड तालुका तसेच रायगड जिल्ह्यातून शुभेच्छा दिल्या जात आहेत.
भारतीय हवाईदलात ओंकारची ऐतिहासिक कामगिरी
