| अलिबाग | प्रतिनिधी |
देशी पिस्तुलाची विक्री करणाऱ्यावर रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने कारवाई केली. या कारवाईत दोन देशी पिस्तुल, पाच जिवंत काडतुसासह एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. कर्जत परिसरात गुरुवारी ही कारवाई करण्यात आली.
कर्जत तालुक्यातील चारफाटा परिसरात एक जण देशी पिस्तुल विकण्यासाठी येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक फौजदार राजा पाटील यांना मिळाली.स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नागेश कदम, सहाय्यक फौजदार राजा पाटील, पोलीस हवालदार संदिप पाटील, राकेश म्हात्रे, यशवंत झेमसे, आदी पथकाने गुरुवारी सापळा रचला.
दरम्यान एक इसम येत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्याला ताब्यात घेऊन तपासणी केली. त्यावेळी त्याच्याकडे दोन देशी पिस्तुल, पाच जिवंत काडतूस आदी साठा आढळून आला. सतीश क्षेत्रे ( वय 29 वर्षे ) असे या आरोपीचे नाव आहे. तो मूळचा उरण तालुक्यातील असून सध्या मुंबई चेंबूर येथे राहत आहे. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश कदम करीत आहेत.