महानगर गॅस कामांची प्रत्यक्ष पाहणी

| पनवेल | प्रतिनिधी |

पनवेल महानगरपालिका अधिकारी, इंजिनिअर, महानगर गॅस अधिकारी तसेच परेश ठाकूर यांच्या सहाय्यकांसोबत महानगर गॅस कामांच्या संदर्भात प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. यावेळी महानगर गॅस लाईन टाकण्यासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यांची तसेच सुरू असलेल्या कामांची सविस्तर माहिती घेण्यात आली. पूर्ण झालेल्या महानगर गॅस कामांनंतर संबंधित रस्त्यांची दुरुस्ती व पुनर्बांधणीची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावीत, याबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. तसेच, नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी उर्वरित कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. नागरिकांच्या सोयीसाठी आणि वाहतुकीची अडचण टाळण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याची आवश्यकता यावेळी अधोरेखित करण्यात आली.

Exit mobile version