द्रोणागिरीत ओणम उत्सव संपन्न

। उरण । वार्ताहर ।

उरण तालुक्यातील द्रोणागिरी येथील जेएनपीटी बहुउद्देशीय हॉल येथे ओणम उत्सव कार्यक्रम रविवारी (दि.20) संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात केरळच्या महाबळी राजाच्या स्वागताने करण्यात आली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रदीश चेनॉन, रघुनाथ राघवन, निशा सुधीर व त्यांच्या सहकार्यानी मेहनत घेतली. कार्यक्रमात दहावी व बारावीत उत्तीर्ण झालेल्या मुलांचा सत्कार करून व बक्षीस वितरण करण्यात आले. या कार्यक्रमात थिरुवाथिरा, ओणम नृत्य व इतर केरळचे पारंपरिक नृत्य सादर करण्यात आले होते. तसेच, युथ विंग नृत्य प्रकाराने या कार्यक्रमाची शोभा वाढवली. यावेळी लहानांपासून ज्येष्ठ नागरीकांपर्यंत सर्वांनी सहभाग घेतला.

Exit mobile version