। उरण । वार्ताहर ।
शिवसेना उरण शहरच्या वतीने संपूर्ण शहरात प्रभाग वाईज लसीकरण व फिरता लसीकरण कार्यक्रम संपन्न झाला. शिवसेना जिल्हाप्रमुख माजी आ.मनोहर भोईर व शिवसेना गटनेते गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत कोव्हॅक्सिन व कोविशिल्ड लसीचे डोस अठरा वर्षावरील नागरिकांना उपलब्ध करण्यात आले होते. यामध्ये पहिला व दुसरा डोस यांचा समावेश होता. सदर लसीकरण कार्यक्रम उरण शहरात सलग दहा दिवस तर फिरते लसीकरण कार्यक्रम एक आठवडा राबविण्यात आला. फिरता लसीकरण कार्यक्रमात एका फोनने लसीकरण मोबाईल व्हॅन उरण शहरातील नागरीकांच्या घराजवळ उपलब्ध केली जात होती.