• Login
Wednesday, February 25, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home संपादकीय

पुन्हा एकदा ओबीसींचे राजकीय आरक्षण

Varsha Mehata by Varsha Mehata
May 24, 2022
in संपादकीय, संपादकीय लेख
0 0
0
पुन्हा एकदा ओबीसींचे राजकीय आरक्षण
0
SHARES
60
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

प्रा. अविनाश कोल्हे 

2016 साली असे सर्वेक्षण कर्नाटकात सुरू होते. या सर्वेक्षणाच्या अहवालातील काही भाग फुटला. नंतर कर्नाटकात गदारोळ सुरू झाला. कर्नाटकातील दोन महत्त्वाची जाती म्हणजे लिंगायत आणि वोक्कालिगा. सर्वेक्षणानुसार या दोन जातींची लोकसंख्या समजली जात होती त्यापेक्षा कमी असल्याची माहिती समोर येत होती. त्यामुळे या दोन जातींच्या नेत्यांनी उग्र निदर्शनं केली. 

बुधवार अठरा मे 2022 रोजी सर्वोच्च न्यायालयाने एक ऐतिहासिक निर्णय दिला. या निर्णयानुसार मध्य प्रदेशातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका ओबीसींच्या राजकीय आरक्षणासह घेण्यास मान्यता दिली आहे. यामुळे ओबीसी समाजात आनंदाचे वातावरण पसरले आहे. महाराष्ट्रातील ओबीसींच्या स्थानिक स्वराज्य संस्थातील राजकीय आरक्षणाच्या संदर्भात गेली अनेक वर्षे सुरू असलेल्या घोळाच्या संदर्भात हा निर्णय आश्‍वासक आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्रातील ओबीसी शक्ती, विरोधी पक्ष आणि सत्ताधारी मविआ सरकार वगैरे अनेक शक्ती अडचणीत आलेल्या आहेत. जे मध्य प्रदेशात न्यायालयीन प्रक्रियेतून होऊ शकते ते महाराष्ट्रात का होत नाही, असा साधा प्रश्‍न समोर येतो. मागच्या आठवड्यात भाजपातर्फे सातार्‍या ‘रास्ता रोको’ आयोजित केला होता.
ओबीसींच्या राजकारणाच्या दृष्टीने 1990 च्या दशकाची सुरूवातीची वर्षं फार महत्त्वाची समजली जातात. 16 नोव्हेंबर 1992 रोजी सर्वोच्च न्यायालयाने इंद्रा साहनी खटल्यात दिलेल्या निर्णयामुळे ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला. त्यानंतर 1994 सालापासून महाराष्ट्रात ओबीसींना स्थाानिक स्वराज्य संस्थांत आरक्षण देण्यात आले. मात्र गेली काही वर्षे हेच आरक्षण वादाच्या भोवर्‍यात आणि सरकारी कारभारातील गोंधळात अडकलेले आहे. मात्र यात आता मध्यप्रदेश सरकारने बाजीमारली आहे.
तसं पाहिलं तर स्थानिक स्वराज्य संस्थांत 50 टक्क्यांपेक्षा जास्त असता कामा नये ही सर्वोच्च न्यायालयाची भूमिका होती आणि आजही आहे. महाराष्ट्रात हे आरक्षण रखडल्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे राज्य सरकारने आतापर्यंत न्यायालयाला हवा असलेला डाटा गोळा केलाच नाही. या प्रकरणाला ‘केंद्रराज्य संबंधाचा’ आणखी एक आयाम आहे. सर्वोच्च न्यायालयाला हवा असलेला डाटा केंद्र सरकार देत नाही, अशी भूमिका महाराष्ट्र सरकारची भूमिका आहे. आता मात्र असं म्हणावेसे वाटत की जर केंद्र हा डाटा देत नसेल तर राज्य सरकारने तो गोळा करावा. असं नेहमी केंद्राकडे बोट दाखवून राज्य सरकारला जबाबदारी झटकता येणार नाही. मध्य प्रदेश सरकारने पुढाकार घेऊन डाटा गोळा केला आणि आरक्षणाच्या मार्गातील अडथळा दूर केला. असं जरी असलं तरी न्यायालयाने या डाटाच्या कायदेशीरपणाबाबत कोणतेही मत व्यक्त केलेले नाही. यासंबंधातील पुढच्या सुनावणीच्या वेळी याबद्दल न्यायालय विचार करणार आहे. मात्र याचा परिणाम आरक्षणावर होणार नाही. ही महत्त्वाची वस्तुस्थिती लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने डाटा गोळा करावा.
मध्य प्रदेशात ओबीसी आरक्षण सुरू ठेवण्याबद्दलचा निर्णय देतांना सर्वोच्च न्यायालयाने मध्य प्रदेश सरकारने सादर केलेला राज्य इतर मागासवर्गीय आयोगाचा अहवाल ग्राह्य धरला आहे. हीच सर्वात महत्त्वाची बाब आहे जी पुढची चर्चा करतांना लक्षात ठेवली पाहिजे. काही अभ्यासक दाखवून देतात त्याप्रमाणे इ.स. 2010 पासून सर्वोच्च न्यायालय ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या संदर्भात शास्त्रीय माहितीचा आग्रह धरत आहे. शैक्षणिक आरक्षण आणि सरकारी नोकर्‍या यासाठी अशा माहितीची गरज नाही. डिसेंबर 2021 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि कर्नाटक या तीन राज्यांतील स्थानिक स्वराज्य संस्थांतील निवडणूका अशी शास्त्रीय माहिती उपलब्ध न करून दिल्यामुळे पुढे ढकलल्या होत्या. आता मध्य प्रदेश सरकारने अशी शास्त्रीय माहिती न्यायालयात सादर केल्यामुळे तेथे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांचा मार्ग मोकळा झालेला आहे. तसे अजूनही महाराष्ट्रात झालेले नाही.
मध्य प्रदेश सरकारने 12 मे 2022 रोजी न्यायालयात मागासवर्गीय आयोगाचा सुधारित अहवाल सादर केला. न्यायालयाने घालून दिलेेल्या तीन चाचण्यांची पूर्तता करत हा अहवाल बनवला आहे, असा मध्य प्रदेश सरकारचा दावा होता. हा दावा न्यायालयाने मान्य करत आरक्षणाला हिरवा कंदील दाखवला आहे.
महाराष्ट्रात मात्र या संदर्भात अभूतपूर्व गोंधळ सुरू आहे. मध्य प्रदेशातील ओबीसींचे आरक्षण ग्राह्य धरत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आल्यापासून तर महाराष्ट्रात एकमेकांवर आरोप करण्याची अहमहमिका लागलेली दिसते. मविआ सरकारने ओबीसी आरक्षणाची हत्या केली, असा आरोप भाजपाने केला आहे. यातील राजकीय धूळवड बाजूला ठेवत मूळ समस्या समजून घेतली पाहिजे. 4 मार्च 2021 रोजी (म्हणजे तब्बल 14 महिन्यांनी पूर्वी) सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील रद्द करण्यात आलेल्या ओबीसींच्या राजकीय आरक्षणाची फेरस्थापना करण्यासाठी समर्पित आयोग स्थापन करा. या आयोगामार्फत ओबीसींचे राजकीय मागासलेपण सिद्ध करण्यासाठी सांख्यिकी अहवाल तयार करा आणि हे सर्व करतांना पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडली जाणार नाही, याची काळजी घ्या अशा तीन अटी घातल्या होत्या. मध्य प्रदेश सरकारने या तिन्ही अटींची पूर्तता करत नवा अहवाल सादर केला. त्यामुळे त्या राज्यातील ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे
महाराष्ट्रात तसे झाले नाही. महाराष्ट्रातील ओबीसी आरक्षणावर सुनावणी करतांना सर्व्वोच्च न्यायालयाने ‘ट्रिपल टेस्ट’ करण्याचा पहिला आदेश 13 डिसेंबर 2019 रोजी दिला होता. त्यानंतरच जर राज्य सरकारने ‘ट्रिपल टेस्ट’ प्रमाणे सर्वोच्च न्यायालयाला आवश्यक ती माहिती सादर केली असती तर आज ही वेळ आली नसती. नंतर 4 मार्च 2021 रोजी सर्वोच्च न्यायालयाने तीन अटी घालून दिल्यानंतर महाराष्ट्राने तीन महिन्यांनी राज्य मागासवर्गीय आयोगालाच ‘समर्पित आयोग’ म्हणून घोषित केले. नंतर ऑक्टोबर 2021 पर्यंत या आयोगाला एक पैशाचा निधी उपलब्ध करून दिला नाही. जेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका जवळ यायला लागल्या तेव्हा सरकारने या आयोगाला अहवाल सादर करण्यास सांगितले. असा अहवाल देण्यास आयोग नाखूष असतांनासुद्धा राज्य सरकारने अहवाल तयार करवून घेतला आणि सर्वोच्च न्यायालयाला सादर केला. अपेक्षेप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाने हा अहवाल फेटाळला. नंतर राज्य सरकारने आधीचा आयोग रद्द केला आणि नवीन आयोग स्थापन केला. असा हा गोंधळ सुरू होता. तिकडे पलिकडे मध्य प्रदेश सरकारने मात्र गाजावाजा न करता सर्वोच्च न्यायालयाची ‘तिहेरी चाचणी’ पूर्ण करणारा अहवाल बनवण्यासाठी कारवाई सुरू केली. महाराष्ट्र याबाबतीत मागे राहिला.
यातील कळीचा मुद्दा आहे ओबीसींची सांख्यिकी माहिती गोळा करण्याचा. त्याबद्दल जोपर्यंत ठसठशीत कारवाई होत नाही तोपर्यंत हा गोंधळ संपणार नाही. अर्थात अशी सांख्यिकी माहिती गोळा करणे अतिशय किचकट तर आहेच शिवाय वादग्रस्तसुद्धा ठरू शकते. 2016 साली असे सर्वेक्षण कर्नाटकात सुरू होते. या सर्वेक्षणाच्या अहवालातील काही भाग फुटला. नंतर कर्नाटकात गदारोळ सुरू झाला. कर्नाटकातील दोन महत्त्वाची जाती म्हणजे लिंगायत आणि वोक्कालिगा. सर्वेक्षणानुसार या दोन जातींची लोकसंख्या समजली जात होती त्यापेक्षा कमी असल्याची माहिती समोर येत होती. त्यामुळे या दोन जातींच्या नेत्यांनी उग्र निदर्शनं केली. परिणामी हे सर्वेक्षण थांबवावे लागले. ‘जातीनिहाय सर्वेक्षण’ हा या वादातील महत्त्वाचा मुद्दा आहे.
सर्वोच्च न्यायालयाने अशी चपराक दिल्यानंतर महाराष्ट्राने माजी मुख्य सचिव जयंत बांथिया यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग स्थापन केला आहे. यात सहा सदस्य आहेत. या समितीचा अहवाल लवकरच अपेक्षित आहे. हा अहवाल जर न्यायपालिकेची तिहेरी चाचणी पूर्ण करणारा असेल, अशी अपेक्षा करायला हरकत नाही.
ओबीसी आरक्षणाबद्दल एक महत्त्वाची बाब म्हणजे सर्व राजकीय पक्षांचा या मागणीला पाठिंबा आहे. मध्यंतरी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून काही निवडणूका विनाआरक्षण घेणे भाग पडले. तेव्हा सर्वच पक्षांनी पूर्वीच्या राखीव मतदारसंघांत ओबीसी उमेदवार दिले होते. हे पुरेेसे आश्‍वासक आहे. 

Related

Tags: alibageditorial articlemarathi newsmarathi newspaperraigad
Previous Post

योग्य वेसण

Next Post

अलिबाग तालुक्यातील एका नवीन रुग्णासह जिल्ह्यात चार कोरोना रुग्ण; दोन कोरोना मुक्त

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

दरडग्रस्तांच्या दुर्दैवाची कहाणी – भाग 1
पोलादपूर

दरडग्रस्तांच्या दुर्दैवाची कहाणी – भाग 1

July 25, 2025
Success Story! रायगड जिल्हा परिषदेच्या नवीन सीईओ- नेहा भोसले
sliderhome

Success Story! रायगड जिल्हा परिषदेच्या नवीन सीईओ- नेहा भोसले

April 2, 2025
वसंत गुरुजी- निष्ठावंत मार्गदर्शक हरपला: जयंत पाटील
sliderhome

वसंत गुरुजी- निष्ठावंत मार्गदर्शक हरपला: जयंत पाटील

March 18, 2025
जिद्दीने भरले ‘ती’च्या पंखात बळ
रायगड

जिद्दीने भरले ‘ती’च्या पंखात बळ

March 8, 2025
जिद्दीने भरले ‘ती’च्या पंखात बळ
रायगड

जिद्दीने भरले ‘ती’च्या पंखात बळ

March 8, 2025
अनेकांचे जीव वाचवणारी रुचिका
रायगड

अनेकांचे जीव वाचवणारी रुचिका

March 8, 2025
Next Post
24 तासांत 2 लाख 67 हजार कोरोना रुग्णांची नोंद, मृत्यूचे प्रमाण वाढले

अलिबाग तालुक्यातील एका नवीन रुग्णासह जिल्ह्यात चार कोरोना रुग्ण; दोन कोरोना मुक्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?