कुंभार्ली घाटात पकडली दीड कोटींची दारू


। दापोली । वृत्तसंस्था ।
गोवा बनावटीची दीड कोटीची दारू कुंभार्ली घाटात पकडली मध्यरात्री कुंभार्ली घाटात केली मोठी कारवाई ट्रकमधून गोवा ते नाशिकला घेऊन जात होते विनापरवाना दारू राज्य उत्पादन शुल्कच्या मुबई भरारी पथकाची सर्वात मोठी कारवाई ट्रक व युटिलिटीसह दीड कोटींचा माल केला जप्त गोवा बनावटीची दारू एक ट्रक मध्ये भरून दोन संशयित नाशिकला चालले होते याबाबत राज्य उत्पादन शुल्कच्या मुबई भरारी पथकाने सापळा रचुन ही मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणाची राज्य उत्पादन शुल्क विभागाला टीप मिळाली होती,त्यावरुन त्यांनी हा सापळा रचुन कारवाई केली. सापळा रचला त्यानुसार मध्यरात्रीच्या दरम्यान सदरचा ट्रक कराड चिपळूण मार्गवरील कुंभार्ली घाटात आला असता मुंबईच्या भरारी पथकाने मध्यरात्री सापळा रचून शिताफीने पकडले असता खेर्डी येथील देवकर कंपनीत नेऊन पंचनामा करण्यात आला यावेळी ट्रक मध्ये गोवा बनावटीचा दीड कोटींचा माल जप्त करण्यात आला यावेळी ट्रक सह युटिलिटी गाडी व दोघांना ताब्यात घेण्यात आले रत्नागिरी लॉकडाऊन उठविल्यानंतर पहिलीची मोठी कारवाई राज्य उत्पादन शुल्क यांनी करून दीड कोटींचा माल जप्त केला .

Exit mobile version