। पनवेल । प्रतिनिधी ।
चौघा जणांनी चाकू आणि लोखंडी रॉडने धमकावून डंपरमधील 310 लिटर डिझेलची चोरी केल्याप्रकरणी चौघां विरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. नबीर सूल दिघी हा पनवेल येथे राहत असून, पळस्पे ते जेएनपीटी हायवेवर नांदगाव येथे लघुशंका करण्यासाठी त्याने डंपर रस्त्याच्या कडेला पार्क केला आणि लघुशंकेसाठी गेला असता लाल रंगाच्या कार आणि ग्रे रंगाची कारमधून चार व्यक्ती आले आणि त्यांनी दिघी याला चाकू आणि लोखंडी रॉडने धमकावले आणि डंपर मधील 310 लिटर डिझेलची चोरी केली.






