। पनवेल । वार्ताहर ।
लोखंडी पिस्तूल बाळगणार्या इसमास गुन्हे शाखा कक्ष 3 ने अटक केली आहे. याप्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात आरोपी जावेद जहिद खान याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुरुद्वारा ते पापडीचा पाडा कडे जाणार्या रस्त्यावर तळोजा जेल कमानीच्या परिसरातील बस स्टॉपजवळ एक इसम बेकायदेशीर पिस्तूल घेऊन येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा कक्ष 3 चे पोलीस नाईक संजय फुलकर यांना मिळाली होती. त्यानुसार वपोनी शत्रुघ्न माळी आणि त्यांच्या पथकाने त्या ठिकाणी सापळा रचला. यावेळी एक इसम चालत येऊन थांबल्याचे दिसून आला. पोलिसांनी त्याला घेराव घालून ताब्यात घेतले. जावेद जहिद खान (26, रा. मुंब्रा-कल्याण फाटा, मूळ गाव उत्तर प्रदेश) याची अंगझडती घेतली असता त्याच्या खिशामध्ये एक लोखंडी पिस्तूल व एक जिवंत राऊंड/दारूगोळा सापडून आला. त्याच्याकडे लायसन्सची विचारणा केली असता कोणतेही लायसन्स नसल्याचे सांगितले.