गुरे चोरी प्रकरणी एकास अटक

दोन दिवसांची पोलीस कोठडी
। पाली/बेणसे । वार्ताहर ।
सुधागड तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक भागात मध्यरात्री गुरांना गुंगीचे इंजेक्शन देऊन चोरी करणारी टोळी सक्रिय झाल्याने शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुधागड तालुक्यातील कसईशेत गावातील 8 गुरे चोरीला गेली होती. तर अनेक गुरे बेशुद्धावस्थेत पडली होती. बुधवारी (दि.8) या प्रकरणातील एका आरोपीला जांभूळपाडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याला रोहा कनिष्ठ न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती जांभुळपाडा पोलीस दुरक्षेत्रमधून देण्यात आली आहे.

Exit mobile version