महिलेच्या खुनाप्रकरणी एकास अटक

पनवेल | वार्ताहर |
वाशीतील इनऑर्बीट मॉलच्या पाठीमागील बाजूस पाम बीचकडून येणार्‍या ब्रिजखाली काही दिवसांपूर्वी गळ्यावर व चेहर्‍यावर आघात करून ठार मारलेल्या महिलेच्या मृत्यूचे गूढ उकलण्यात वाशी पोलिसांना यश आले आहे.
याप्रकरणी पोलिसांनी कानीफनाथ दिलीप कांबळे नावाच्या (26), रस्त्यावर राहणार्‍या व मूळच्या लातूर जिल्ह्यातील शेडोळ गावचा रहिवासी असलेल्या आरोपीस अटक केली आहे. दरम्यान, वाशी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दि.2 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास इनऑर्बीटच्या पाठीमागील पामबीचकडून येणार्‍या ब्रिजखाली अर्धवट शरीर गोणीत तर पाय बाहेर अशा कुजलेल्या अवस्थेतील हत्या केलेला मृतदेह आढळून आला होता. सदरचा मृतदेह गोवंडीतील बबनबाई शांतीवन कांबळे नावाच्या 70 वर्षीय महिलेचा असल्याचे तिच्या नातेवाईकांनी ओळखले.

Exit mobile version