आयसीसीकडून एक दिवसीय संघ जाहीर

| मुंबई | वृत्तसंस्था |

आयसीसीने जाहीर केलेल्या 11 खेळाडूंच्या संघाची कमान रोहित शर्माकडे सोपवण्यात आली आहे. त्याने गेल्या वर्षी एकदिवसीय सामन्यात 1255 धावा केल्या होत्या. रोहितचा जोडीदार म्हणून शुभमन गिलची निवड करण्यात आली आहे. विश्‍व चषकमध्ये त्याची कामगिरी फारशी चांगली नाव्हती, पण गतवर्ष त्याच्यासाठी संस्मरणीय ठरले. त्याने आपल्या बॅटने उत्कृष्ट खेळी केली. तिसर्‍या क्रमांकासाठी ऑस्ट्रेलियाच्या ट्रॅव्हिस हेडची निवड केली आहे. ज्याने उपांत्य फेरीत आणि नंतर फायनलमध्ये भारतीय संघाविरुद्ध शानदार खेळला होता. त्याने भारतीय संघाविरुद्ध 137 धावांची खेळी खेळली आणि सामना जवळपास एकतर्फी केला.

भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीची चौथ्या क्रमांकासाठी निवड करण्यात आली आहे. कोहलीने 2023 मध्ये 6 शतके झळकावली होती. यासोबतच त्याने सचिन तेंडुलकरचा वनडेमध्ये सर्वाधिक शतके ठोकण्याचा विक्रमही मोडला. न्यूझीलंडच्या डॅरिल मिशेलसह दक्षिण आफ्रिकेच्या हेनरिक क्लासेनलाही आयसीसीने स्थान दिले आहे. दक्षिण आफ्रिकेचा मार्को जॅनसेनही संघात स्थान मिळवण्यात यशस्वी ठरला. तर ऑस्ट्रेलियाच्या अ‍ॅडम झाम्पाचाही संघात समावेश करण्यात आला आहे. त्यात वेगवान गोलंदाज म्हणून मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमीला स्थान देण्यात आले आहे. कुलदीप यादवही संघात आहे. सिराजने श्रीलंकेविरुद्ध आपल्या घातक गोलंदाजीने कहर केला, तर मोहम्मद शमीने कमी सामने खेळूनही आयसीसी एकदिवसीय वर्ल्ड कप सर्वाधिक विकेट्स घेतल्या.

आयसीसी वनडे टीम ऑफ द ईयर 2023
रोहित शर्मा, शुबमन गिल, ट्रेविस हेड, विराट कोहली, डॅरिल मिचेल, हेनरिक क्लासेन, मार्को जेन्सन, ऍडम झॅम्पा, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी.

Exit mobile version