एक दिवसीय विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धा; भारत आला तरच आम्ही येऊ

पाकिस्तान क्रीडामंत्र्यांचे स्पष्ट मत

| इस्लामाबाद | वृत्तसंस्था |

जर भारताने आशिया चषकासाठी पाकिस्तानला येणे टाळले तर आम्ही पण 2023 चा विश्‍वचषक भारतात खेळायला येणार नसल्याचे पाकचे क्रीडा प्रभारी मंत्री एहसान मजारी यांनी जाहीर केले आहे. यामुळे पाकच्या सहभागाबाबत साशंकता निर्माण झालेली आहे. विश्‍वचषक स्पर्धेतील सहभागाबाबत पाकिस्तानकडून सातत्याने वक्तव्य केले जात आहे. एकीकडे ठिकाणांबाबत भारताच्या दौर्‍यावर बहिष्कार टाकण्याची आणि आशिया कप 2023 चे आयोजन करण्याबद्दल बोलत आहे. दुसरीकडे आता क्रीडा प्रभारी मंत्री एहसान मजारी यांनीही आधी भारताने पाकमध्ये यावे असे जाहीर केले आहे. इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना मजारी म्हणाले, माझे वैयक्तिक मत आहे की, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड माझ्या मंत्रालयाच्या अंतर्गत येते. त्यामुळे जर भारताने त्यांचे आशिया चषक सामने तटस्थ ठिकाणी खेळवण्याची मागणी केली आहे, तर आम्ही भारतातील आमच्या विश्‍वचषक सामन्यांसाठीही तशी मागणी करू. असे त्यानी सांगितले.

पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी ऑक्टोबर-नोव्हेंबर विश्‍वचषकमध्ये भारताच्या सहभागाच्या मुद्द्यावर विचार करण्यासाठी एक उच्च-स्तरीय समिती स्थापन केल्यानंतर हे विधान आले आहे. समितीचा आदेश सामायिक करताना, मजारी म्हणाले, समितीचे नेतृत्व परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी करतील आणि मी त्यात सहभागी असलेल्या 11 मंत्र्यांपैकी एक आहे. आम्ही या विषयावर चर्चा करू आणि आमच्या शिफारशी पंतप्रधानांना देऊ, जे पीसीबीचे संरक्षक-इन-चीफ देखील आहेत. अंतिम निर्णय पंतप्रधान घेतील. असे ते म्हणाले.

आशिया चषकाचे वेळापत्रक अद्याप जाहीर झाले नसले तरी, पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्याबाबत एसीसीमध्ये एकमत झाल्याचे कळते. भारताने आपले सर्व सामने श्रीलंकेत खेळणे अपेक्षित आहे. मात्र, आपण या महायब्रीड मॉडेलफच्या बाजूने मी नाही. पाकिस्तान हा यजमान आहे, त्याला सर्व सामने पाकिस्तानमध्ये आयोजित करण्याचा अधिकार आहे. क्रिकेटप्रेमींना तेच हवे आहे, मला हायब्रीड मॉडेल नको आहे.

एहसान मजारी, क्रीडा प्रभारी मंत्री

जेव्हा मजारी यांना पाकिस्तानमधील त्यांच्या क्रिकेटपटूंच्या सुरक्षेबाबत भारताच्या दीर्घकालीन आक्षेपाबाबत विचारण्यात आले तेव्हा ते म्हणाले की, हा ठोस युक्तिवाद नव्हता. न्यूझीलंड संघ येथे आला, त्यापूर्वी इंग्लंड क्रिकेट संघ पाकिस्तानमध्ये होता. त्यांना राष्ट्रपती सुरक्षा मिळाली आहे. भारतीय संघाचे सुरक्षा फक्त एक निमित्त आहे. आम्ही पाकिस्तान सुपर लीग देखील आयोजित केली ज्यामध्ये बरेच परदेशी खेळाडू होते. असेही त्यानी सांगितले.

Exit mobile version